राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करावी, याची शिफारस करण्यासाठी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य काही नेते यावेळी उपस्थितीत होते.
पाकला अगोदर चीनने वाचवले अन् आता कोरोनाजन्य परिस्थितीनं
राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा राज्यपालांना विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रीमंडळ ठराव पत्र आम्ही सुपूर्द केले, असा उल्लेख जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारसीचा निर्णय राज्याच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला होता. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक न लढवता २८ नोव्हेंबर २०१९ रोजी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारचा खास प्लॅन
कोणत्याही सभागृहाचा सदस्य न होता मंत्रिपदाची शपथ घेता येते. परंतु, पुढील सहा महिन्यात संबधित मंत्र्याला दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून यावे लागते. गेल्या एक महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे देशातील अनेक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडून यावे लागणार आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन रिक्त जागेपैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवण्याचा निर्णय कॅबिनेटने घतेला असून याला राज्यपालांच्या मंजूरीची आवश्यकता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks व महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मा. राज्यपाल@BSKoshyari यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या २रिक्त जागांपैकी एका जागेवर मा. मुख्यमंत्री@CMOMaharashtra यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मंत्री मंडळाची शिफारस मा. राज्यपालांकडे केली. pic.twitter.com/fe5g5uy5tV
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 28, 2020