पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच सरकार स्थापन करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यादरम्यान सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु होती. तेव्हा अचानक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी घाईघाईने फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, हे सरकार ८० तासांतच पडले होते. त्याचबरोबर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील भेटीची अर्धवट माहिती सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्या बैठकीतील उर्वरित भागही योग्यवेळी आम्ही समोर आणू, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर विद्यापीठ नामविस्ताराबाबत CM ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती

फडणवीस हे 'झी २४ तास' हे वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी माझी काही आमदारांशी बोलणीही करुन दिली. त्या आमदारांनी भाजपबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबाबत शरद पवार यांच्याशी चर्चाही केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क केला आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी जावू इच्छित नसल्याचे सांगितले. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार चालू शकत नाही. स्थिर सरकारसाठी आम्ही भाजपबरोबर जाऊ इच्छितो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

आठवलेंनी या घोषणेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार

भाजप नेत्यांच्या मते हे पाऊल उलटे पडले आणि येणाऱ्या दिवसांत याबाबत आणखी माहिती समोर येईल. 

फडणवीस यांनी अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटबाबतही भाष्य केले. अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटबाबत आपला काहीही संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार विरोधी शाखेचे प्रतिज्ञापत्र हे २७ नोव्हेंबरचे आहे, आणि मी २६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता.

निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले फोन उचलणे बंद केले. त्यांनी संपूर्ण संवादच बंद केला, ही अत्यंत खेदजनक बाब होती, असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षे आमच्यात चांगला संवाद होता, असेही त्यांनी सांगितले.

आलम 'पनाह' ३४ वर्षांचा गडी १० वर्षानंतर पाकच्या राष्ट्रीय संघात

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ajit approached us Sharad Pawar hid half conversation he had with PM Modi claims Devendra Fadnavis