पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता एजाज खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एजाज खान

टीक टॉकवरील एका वादग्रस्त व्हिडीओमुळे अटकेत असलेल्या अभिनेता एजाज खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १८ जुलैला एजाज खानला टीक टॉकवरील वादग्रस्त व्हिडीओमुळे  अटक केली होती. त्याच्यावर  आक्षेपार्ह मजकूर तयार करणं, या  मजकूराद्वारे समाजात आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधान संहिता  कलम १५३ (अ) आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

झारखंडमधील मॉब लिंचिंग प्रकरणानंतर एजाज खानचा टिक टॉक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओद्वारे त्यानं एका विशिष्ट समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यही केलं होतं. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांवरही त्यानं टिका केली होती. एजाज खान यानं यापूर्वीही अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर यापूर्वीही अनेक सोशल मीडिया युजर्सनं आक्षेप घेतला होता. हे व्हिडीओ एका विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना भडकवून समाजात तेढ निर्माण करू शकतात असं वारंवार युजर्सनं निदर्शनास आणून दिलं होतं. अखेर गुरूवारी मुंबई पोलिसांनी कारवाई करत एजाज खानला अटक केली होती.