कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेतील वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात अखेर एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी माफी मागितली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्वाच्या विरोधातील सभेत १०० कोटींवर आम्ही १५ कोटी भारी पडू, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यातून त्यांनी हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.
गुजरातमध्ये जे झालं, ते वारिस पठाण यांनी विसरु नयेः भाजप नेता
या मुद्यावरुन पक्षाने त्यांच्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी घातली होती. राजकीय वातावरण तापल्यानंतर राज्य घटनेच्या चौकटीत राहूनच बोलल्याचे सांगत त्यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. मात्र शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.
स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!
वारिस पठाण म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मी भाष्य केले नव्हते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. यावरुन मला देश विरोधक भासवण्यात आले. राजकीय षडयंत्र रचून माझ्यासह पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी भारताचा नागरिक असल्याचा अभिमान असल्याचे सांगत माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे.