पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ते वक्तव्य हिंदू बांधवासाठी नव्हे तर RSS-BJP वाल्यांसाठी'

वारिस पठाण यांनी भाजप आरएसएसवर निशाणा साधला आहे.

एमआयमचे नेते आणि माजी खासदार वारिस पठाण यांनी  कर्नाटकमधील गुलबर्गा सभेत केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे. आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत आपल्याला नेमके काय म्हणायचे होते, हे सांगण्याचा प्रयत्न वारिस पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.   

माफी मागितल्यानंतर वारिस पठाण म्हणाले, जय हिंद!

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना वारिस पठाण म्हणाले की, माझ्या बोलण्याचा रोख हा देशातील हिंदू बांधवाकडे नव्हता. आरएसएस, भाजप आणि बजरंग दल यासारख्या हिंदू संघटनेतील १०० लोकांना उद्देशून मी ते वक्तव्य केले होते. मी एक सच्चा मुसलमान आहे. भारताचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. 

स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!

काही वृत्तवाहिन्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या बातम्या दाखवून देशभक्त होण्याचा दावा करतात, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. शाहिन बागमधील मुस्लीम भगिनिंना त्यांनी झाशीच्या राणीची उपमा दिली. मुस्लीम भगिनी शाहिन बागमध्ये झाशीच्या राणीप्रमाणे सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरोधात लढा देत असल्याचे ते म्हणाले. या कायद्याच्या विरोधात १५ कोटी मुस्लीम लोक नाराज आहेत. याशिवाय अन्य धर्मातील लोकांनाही कायदा अमान्य असल्याचा उल्लेखही वारिस पठाण यांनी केला.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:AIMIM leader Waris Pathan apologise controversial statement than Target BJP RSS And Bajrang Dal