पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बहुमत चाचणी जिंकणार: अहमद पटेल

अहमद पटेल

संविधानाची अवहेलना करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा झाला आहे. लपून छपून शपथविधी झाला आहे. शपथविधीचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. हा निर्लजपणाचा कळस असून काँग्रेसकडून या शपथविधीचा निषेध केला जात असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी अहमद पटेल यांनी टीका केली.

राज्यपालांनी काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी दिली नसल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले. सत्तास्थापनेसाठी काँग्रेसकडून कोणताही उशीर झालेला नाही. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने हा पेच पाहायला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला पाडण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बहुमताची चाचणी जिंकणार, असल्याचा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला. आतासुध्दा सरकार बनू शकते. तसंच, काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादी आणि सेनेसोबत काँग्रेसचा कोणताही संभ्रम नाही. काँग्रेसचे आमदार फुटणार नाही यावर विश्वास असल्याचे पटेल यांनी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ahmed patel says congress ncp shivsena parties are together in this and i am confident we will defeat bjp