पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्रामविकास, कृषी किंवा सहकारपैकी एक खाते काँग्रेसला हवे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Photo by Satish Bate)

राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० डिसेंबरला होतो आहे. पण त्याआधी महत्त्वाचे खाती मिळवण्यासाठी या तीन पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सध्या शिवसेनेकडे असलेले गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याची माहिती आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादीकडील दुसरे एखादे खाते शिवसेनेला दिले जाईल. आता काँग्रेसनेही ग्रामीण भागाशी जोडलेले एखादे खाते आपल्याला मिळावे, त्याबदल्यात दुसरे खाते देण्यास आपण तयार आहोत, अशी मागणी केली आहे. काँग्रेसने ग्रामविकास, कृषि किंवा सहकार यापैकी एका मंत्रालयाची मागणी केली आहे. त्याबदल्यात महसूल, सार्वजनिक बांधकाम किंवा ऊर्जा यापैकी एखादे खाते देण्यास काँग्रेस तयार असल्याची माहिती आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'मधील वृत्तानुसार, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने आपली मागणी औपचारिकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवली आहे.

NRC मुद्द्याला भाजपचा केवळ अल्पविराम, प्रशांत किशोर यांची टीका

सध्या ग्रामविकास आणि सहकार ही दोन खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर कृषि खाते शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडे सध्या गृह, नगरविकास आणि उद्योग खाते आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ, ग्रामविकास, गृह निर्माण, सिंचन ही खाती आहेत. ग्रामीण भागातील राजकारणामध्ये ग्रामविकास खाते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 

महाविकास आघाडी स्थापन होताना काँग्रेसने सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. पण नंतर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद तर काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. 

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, ग्रामीण भागाशी संबंधित सर्व महत्त्वाची खाती काँग्रेसने आपल्याकडे ठेवावीत. यामुळे ग्रामीण भागात काँग्रेसचा विस्तार होण्यास मदत होईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले आहे. २०१४ नंतर ग्रामीण भागातील जनतेशी काँग्रेसचा संपर्क-संवाद कमी झाला आहे. तो पुनर्प्रस्थापित करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल, असेही या नेत्याने सांगितले.