पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी मुंबई अध्यक्षांना बोलावणे धाडले

एकनाथ गायकवाड आणि सोनिया गांधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती सुरुच आहे. मंगळवारी एकाच दिवसामध्ये काँग्रेसला दोन धक्के बसले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी एकाच दिवशी लागोपाठ राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यासाठी एकनाथ गायकवाड हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

वाहतूक नियमः गुजरातने ९० टक्क्यांपर्यंत कमी केली दंडाची रक्कम

मुंबई काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून काही नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येऊन भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकरांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया उर्मिला यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. 

काश्मीरः लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा

उर्मिला यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. दिल्ली येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सूपूर्द केला. दरम्यान, बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि पुत्र नारा लोकेश नजरकैदेत