पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली निकालानंतर महाविकास आघाडीला आणखी बळ

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या हाती आलेली सत्ता देखील निघून गेली. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या हातून आता एक एक राज्य निसटत चालले आहेत. दिल्लीमध्ये सत्ता येणार अशी भाजपला अपेक्षा होती. मात्र दिल्लीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे देशातील भाजपविरोधी पक्षांना आणखी बळ मिळाले आहे. दिल्ली निवडणूक निकालामुळे भाजपविरोधी एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

देश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे

महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता होती मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळवून सुध्दा भाजपला सत्ता गमवावी लागली होती. कारण ही निवडणूक शिवसेना- भाजपने एकत्र लढवली होती. या निवडणुकीमध्ये भाजपने अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचे वचन शिवसेनेला दिले होते, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. मात्र ऐनवेळी भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांना एकत्र घेत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले होते.

विजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू!'

महाराष्ट्रामध्ये तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे राजकीय अभ्यासक आणि भाजपचे काही नेते म्हणत होते. भाजपच्या विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सुध्दा भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. दिल्ली निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधकांना आणखी बळ मिळाले. दिल्लीतील लोकांनी मन की बात नाही तर जन की बात सांगितली असल्याचा टोला दिल्लीतील निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?