प्रशासकिय अधिकारी (आयएएस) अश्विनी भिडे यांच्याकडे कोरोना विषाणू व्यवस्थानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासह आयएएस अधिकारी डॉक्टर रामस्वामी एन. यांची देखील या विशेष टीममध्ये वर्णी लागली आहे. राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी देत भारतीय प्रशासकीय सेवेतील या दोन अधिकाऱ्यांना बृहमुंबई पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनामुळे देशात लागू होणार आणीबाणी? लष्कराने सांगितले सत्य
अश्विनी भिडे या १९९५ बॅचच्या आएएस अधिकारी असून डॉ. रामस्वामी हे २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. राज्य सरकारने सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दोन्ही अधिकारी उपस्थित होते. आरे कारशेडच्या मुद्यावरुन शिवसेनेसोबत पंगा घेतल्याने अश्विनी भिडे चांगल्याचे चर्चेत आल्या होत्या. डिसेंबरमध्ये मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या संचालक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर अश्विनी भिडे यांचा कार्यभार हा रणजितसिंह देओल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती.
कोरोनाच्या मर्यादित समूह संसर्गाला देशात सुरुवात, आरोग्य मंत्रालय
त्यानंतर आता अश्विनी भिडे यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना विषाणूची दहशतही मोठ्या प्रमाणात आहे. देशात केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढत आहे. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून धडाडीच्या अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबादारी देण्यात आली आहे.