पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिक्षा, टॅक्सींवरील जाहिरातींसाठी लवकरच एक नियमावली

ओला, उबर टॅक्सी कॅब

सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ऍप आधारित कॅब यांच्यावर जाहिराती कशा पद्धतीने लावाव्यात, यासाठी लवकरच राज्य सरकार एक नियमावली तयार करणार आहे. 

सध्या रिक्षा, टॅक्सी, कॅबवर वेगवेगळ्या जाहिराती असल्याचे बघायला मिळते. रिक्षाच्या मागील बाजूस, टॅक्सी, कॅबच्या दरवाजांवर, टपावर, मागील दरवाजाच्या काचेवर जाहिराती असल्याचे दिसते. या जाहिरातींच्या माध्यमातून संबंधित गाडीच्या चालक-मालकाला जास्तीचे उत्पन्न कमाविता येते. 

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी नाकारणार?

राज्य वाहतूक प्राधिकरणाची एक बैठक नुकतीच वाहतूक खात्याचे सचिव आशिषकुमार सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांवर जाहिराती कुठे लावाव्यात, त्याचा आकार किती असावा यावर पुणे स्थित 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'कडून शिफारशी मागविण्यात येणार आहेत. या शिफारशी आल्यानंतर या संदर्भातील नियमावली तयार करण्यात येईल आणि ती मंजुरीसाठी प्राधिकरणाच्या बैठकीत मांडली जाईल.

रुपा गांगुलींच्या मुलाच्या गाडीचा अपघात, गाडी थेट भिंतीला धडकली

वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडे अशा पद्धतीने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर जाहिराती लावण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांना परवानगी देण्यापूर्वी या संदर्भात एक नियमावली तयार करणे गरजेचे आहे.

सध्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांवर जाहिराती लावण्यासाठी संबंधित गाडीच्या मालकाने तेथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.