पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेने वेळ वाढवून मागितला, पण...

आदित्य ठाकरे

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला साडेसात वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र मुदतीमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यास शिवसेनेला अपयश आले आहे. शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला मात्र राज्यापालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याची माहिती युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते राज्यापालांना भेटण्यासाठी पावणे सातला दाखल झाले होते. मात्र पाऊण तास वाट पाहून सुध्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय न आल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'राज्यपालांनी वेळ नाकारली. मात्र सरकार स्थापनेचा दावा नाकारला नाही.' 

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबीयांकडून माहिती

दरम्यान, 'महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आम्ही पुढे आलो आहोत. शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा कायम राहणार आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू. आम्हाला महाराष्ट्रात स्थिर सरकार पाहिजे. त्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याचा निर्णय वेळेत न दिल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. 

'शिवसेनेवर विश्वास आहे; बाकी सब बकवास है!