पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'

आदित्य ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगात पाठवा असे वक्तव्य शिसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या या वक्तव्यांवर युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सावरकरांबद्दल संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक आहे. इतिहासावर किती दिवस बोलणार, आताच्या समस्यांविषयी बोलणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

'सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हे भाजपच्या हातात आहे. इतिहासावर चर्चा न करता आताच्या विषयांवर चर्चा करणे गरजेचे आहे. तसंच, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्वच व्यक्ती रत्न आहेत, दैवत आहेत. ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश कोणत्या मार्गावर आहे. देशात सुख-शांती समृध्दीचे वातावरण आहे की नाही ते सुध्दा पाहणे गरजेचे आहे. इतिहासातून शिका, पण आता इतिहासाला इतिहास ठेवून पुढे जाणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. 

निर्भया प्रकरण:दोषींना माफ करा,इंदिरा जयसिंहांचे

आदित्य ठाकरे यांनी पुढे असे सांगितले की, शिवसेना-काँग्रेसची युती कायम आहे. वेगळी विचारधारा एकत्र येऊन देशात काम करते यालाच तर लोकशाही म्हणतात, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना आणि काँग्रेस राज्याचा विकास करण्यासाठी एकत्र आली आहे. दरम्यान, आजची अर्थव्यवस्था आणि जीडीपी पाहून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिले त्यांना अभिमान वाटेल की त्यांना लाज वाटेल हा विचार करणेचे गरजेचे आहे. ते सुध्दा म्हणतील आता या भांडणातून बाहेर पडा आणि देशातील जनतेसाठी, तरुणांसाठी काम करा, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. 

केरळने राहुल गांधींना निवडून विनाशकारी काम केलंयः रामचंद्र गुहा