पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे ट्रेंडिंगमध्ये, महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे संकेत

आदित्य ठाकरे

जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली, तर त्यावेळच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचे स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेचे विधीमंडळात नेतृत्त्व करण्यासाठी आणि संधी मिळाल्यास सरकारमध्येही नेतृत्त्व करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सज्ज झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी मुंबईत 'मातोश्री' निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची, नेत्यांची, उपनेत्यांची झालेली गर्दी बघता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी देतील, असे दिसू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणारः इस्रो प्रमुख

शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांसह, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे, प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध आमदार, मंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यापैकी जवळपास सर्वांनीच आदित्य ठाकरे यांनी आता निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणूक लढवावी, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांना याबद्दल विचारल्यावर हा निर्णय आपले वडील उद्धव ठाकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. जर खरंच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविली तर ते ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारे पहिलेच असतील. 

शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आदित्य ठाकरे यांच्यासाठी आम्ही मुंबईतील विविध मतदारसंघाची पाहणी केली. त्यानंतर माहिम आणि शिवडी हे दोन मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्हीपैकी एका ठिकाणी आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. 

मराठा आरक्षण : अध्यादेशाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, जर येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, तर आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिले जावे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्रीपद नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.