पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हाच तो क्षण, हिच ती वेळ; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देशभरामध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे कुटुंबियांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आजच्या क्षणाचे वर्ण करायला माझ्याकडे शब्द नाहीत, अशी प्रतिक्रिया युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

शपथविधी सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंनी सांगितले की, 'हाच तो क्षण, हिच ती वेळ आहे. अखेर स्वप्न पूर्ण झाले. आता काम करण्यास सुरु झाली आहे.' तसंच, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. 

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्क येथे शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहल्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

PHOTOS: शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थ सज्ज