पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाळांमध्ये CAAचा प्रचार करणे मुर्खपणा, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

आदित्य ठाकरे

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) भाजप शाळांमध्ये जाऊन प्रचार करत आहे. यावरुन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या कायद्याचा प्रचार शाळांमध्ये जाऊन करणे हा मुर्खपणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शाळांमध्ये जाऊन राजकीय प्रचार करण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. 

...म्हणून CM ठाकरेंच्या शब्दानंतरही उपोषण करावं लागलं : छ. संभाजीराजे

भाजपच्या वतीने देशभरात सीएए बाबत जनजागृती करण्यात येत आहे. पक्षाचे नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या वतीने शाळा, महाविद्यालयांमध्येही जाऊन प्रचार केला जात आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. 

VIDEO: कोचीमध्ये काही मिनिटातंच अलिशान इमारत जमीनदोस्त

शनिवारी सकाळी टि्वट करुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शाळांमध्ये जाऊन एखाद्या कायद्याचा असा प्रचार करणे मूर्खपणा आहे. शाळांमध्ये राजकीय प्रचार करणे योग्य आहे का? शाळांमध्ये राजकारण्यांना सहन केले जाणार नाही. जर राजकारण्यांना शाळांमध्ये जाऊन बोलायचे असेल तर त्यांनी लिंग समानता, हेल्मेट, स्वच्छता आदींबाबत बोलावे, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.