पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून १२००० लुटले

पल्लवी जोशी

अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याआधारे त्यांच्या कार्डच्या साह्याने १२ हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पल्लवी जोशी यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी युरो चलनामध्ये व्यवहार केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी ही घटना घडली. त्यादिवशी पल्लवी जोशी वापरत असलेले क्रेडिट कार्ड त्यांच्याच ताब्यात होते. 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना पल्लवी जोशी म्हणाल्या, मला त्या दिवशी पाच ते सहा एसएमएस अलर्ट आले. माझ्या क्रेडिट कार्डच्या माहितीच्या साह्याने चोरट्यांनी युरोमध्ये व्यवहार केले होते. मी लगेचच माझ्या बँकेला या व्यवहारांबद्दल माहिती दिली आणि माझे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यांच्या क्रेडिट कार्डवरून १२ हजार रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी युरोपमध्ये टॅक्सी प्रवासासाठी पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, असे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता 'RSS आणि राष्ट्र उभारणी' विषय

आम्ही या प्रकरणी भारतीय दंडविधान संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे, असे वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र बडगुजर यांनी सांगितले.