पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अतुल परचुरेंची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल

अतुल परचुरे

ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक झाल्यामुळे अभिनेते अतुल परचुरे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात दादर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. एक बॅग खरेदी करण्यासाठी अतुल परचुरे यांनी १७६४१ रुपये दिले. पण ती बॅग न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी एक सोशल मीडिया साईट बघत असताना त्यांना एक जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये खांद्यावर अडकवता येण्याजोगी एक बॅग त्यांना स्वस्तात देण्याची ऑफर देण्यात आली होती. बॅगेची मूळ किंमत ४२६१५ रुपये असून, ती सवलतीत १९१७६ रुपयांना दिली जात असल्याचे त्या जाहिरातीत म्हटले होते. सुरुवातीला अतुल परचुरे यांनी ही बॅग विकत घेण्यासाठी 'पे ऑन डिलिव्हरी' (बॅग मिळाल्यावर पैसे देणे) पर्याय निवडला. पण काही दिवसांनी त्यांना एका अज्ञात इसमाचा फोन आला. त्याने पैसे आधी दिले तर आणखी सवलत देण्यात येईल, असे सांगितले. यानंतर परचुरे यांनी ऑनलाईन पद्धतीने १७६४१ रुपये संबंधित कंपनीच्या नावे वळते केले. 

पैसे दिल्यावर महिना उलटून गेला तरी बॅग न मिळाल्यावर अतुल परचुरे यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मी जिथे पैसे दिले ती वेबसाईट अधिकृत आहे, असे माझे म्हणणे आहे. पण मला कोणी फसवले, याचा शोध पोलिस घेतील, अशी मला आशा आहे, असे अतुल परचुरे यांनी सांगितले.