पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आक्षेपार्ह टीक-टॉक व्हिडीओमुळे अभिनेता एजाज खान अटकेत

एजाज खान

 बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाज आक्षेपार्ह व्यक्तव्यामुळे नेहमीच वादात असतो. टीक टॉकवरील एका वादग्रस्त व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.  हा व्हिडिओ समाजात तेढ निर्माण करणारा आहे  म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आहे. 

त्याच्यावर  आक्षेपार्ह मजकूर तयार करणं, या  मजकूराद्वारे समाजात आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. झारखंडमधील मॉब लिंचिंग प्रकरणानंतर एजाज खानचा टिक टॉक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओद्वारे त्यानं एका विशिष्ट समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यही केलं होतं. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांवरही त्यानं टिका केली होती. 

यापूर्वीही एजाज खान यानं  अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर यापूर्वीही अनेक सोशल मीडिया युजर्सनं आक्षेप घेतला होता. हे व्हिडीओ एका विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना भडकवून समाजात तेढ निर्माण करू शकतात असं वारंवार युजर्सनं निदर्शनास आणून दिलं होतं. अखेर गुरूवारी मुंबई पोलिसांनी कारवाई करत एजाज खानला अटक केली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Ajaz Khan has been arrested for creating uploading videos with objectionable content