पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिव्यात अनधिकृत चाळींवर कारवाई; संतप्त नागरिकांकडून विरोध

दिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई

दिव्यातील सरकारी जमिनीवरील अनधिकृत चाळींवर चाळींवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान स्थानिकांनी जोरदार विरोध केला. जेसीबीवर चढून नागरिकांनी विरोध केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आणि स्थानिक नागरिकांमध्ये यावेळी वाद झाला असल्याचे देखील समोर आले आहे. या भागातील चाळी या १० ते १५ वर्ष जुन्या आहेत. 

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी आहे. जागा बळकावून या ठिकाणी चाळी बांधण्यात आल्या आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून तहसीलदारांनी या चाळीवर कारवाई करण्यात सुरुवात केली. अनधिकृत चाळीवर जेसीबी फिरवण्यात आला. डोक्यावरचे छत गेल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. 

'ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा मला कमीपणा नाही'

कारवाई दरम्यान संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी, लहान मुलं आणि महिलांनी थेट जेसीबीवर चढून विरोध केला. या कारवाई दरम्यान, ५०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही न जुमानता स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. डोक्यावरचे छत गेल्यामुळे आता रहायचे कुठे असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

दिल्लीत या तारखेला होणार मतदान, 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीच