पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नालासोपारा पोलिस ठाण्यात गळा चिरून आरोपीची हत्या

खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

नालासोपारा पोलिस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची एकाने गळा चिरून निर्घृण हत्या केली. बहिणीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या भावोजींची मेहुण्याने हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्र काळे याला अटक केली आहे. पोलिसांच्या समोर पोलिस ठाण्यातच हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे. 

भीमा-कोरेगाव प्रकरण: तिन्ही विचारवंताच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

नालासोपाऱ्यातील धनंजय नाका येथील मातृछाया इमारतीत आकाश कोळेकर पत्नी कोमलसोबत राहत होता. दोघांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. घरगुती कारणावरुन दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. १३ ऑक्टोबरला पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर कोमलने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी कोमलचा पती आकाशला अटक केली. आधीच प्रेमविवाहाला विरोध असताना दोघांनी लग्न केले. त्यानंतर बहिणीच्या आत्महत्येमुळे कोमलचा भाऊ रविंद्र संतप्त झाला होता.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त

सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रविंद्र काळे चाकू घेऊन नालासोपारा पोलिस ठाण्यात गेला. यावेळी पोलिस डिटेक्शन रुममध्ये कोमलच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती आकाशची चौकशी करत होते. ही चौकशी सुरु असताना संतप्त झालेला रविंद्र थेट डिटेक्शन रुममध्ये घुसला आणि पोलिसांच्या समोरच त्याने आकाशचा गळा चिरला आणि त्याच्या शरिरावर सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये आकाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी रविंद्र काळे याला अटक केली. 

BLOG : राम शिंदे की रोहित पवार, कर्जत-जामखेडकरांच्या मनात