पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्यवहार ठप्प झाल्याने खातेदार चिंतेत; पीएमसीच्या शाखेत मोठी गर्दी

पीएमसी बँक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादल्यामुळे बँकेचे व्यवहार आज सकाळपासून बंद झाले आहेत. पीएमसी बँकेने खातेदारांना याबाबात माहिती दिली. ही माहिती वाचून चिंतेत आलेल्या खातेदारांनी बँकेमध्ये धाव घेतली आहे. मुंबईसह ठाण्यातील पीएमसी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये खातेदारांनी मोठी गर्दी केली आहे. 

चिन्मयानंद प्रकरणः आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीची होणार चौकशी

अचानक बँकेने व्यवहार बंद केले. तसंच ऑनलाईन व्यवहार देखील बंद झाल्यामुळे खातेदारांचा एकच गोंधळ उडाला. आपल्या ठेवीबाबत चिंतेत आलेल्या खातेदारांनी बँकेच एकच गर्दी केली आहे. बँकेच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खातेदारांची बँकेमध्ये मोठी गर्दी पाहता बँक कर्मचाऱ्यांची देखील तारंबळ उडाली आहे.

'भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बँका डबघाईला आल्यात'

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने बँकेवर निर्बंध लादले आहे. पीएमसी बँकेची आर्थिक स्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या मान्यतेशिवाय बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यामध्ये नवे कर्ज देणे, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करणे, नव्या ठेवी स्विकारणे तसंच बँकेकडून गुंतवणूक करणे यांसारख्ये व्यवहार आता बँकेला करता येणार नाही. तसंच, पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना फक्त १ हजार रुपये ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. 

युती होणार नाही असं वाटणाऱ्यांची निराशा होईलः चंद्रकांत पाटील