पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा उद्यापासून बंद

मुंबई एसी लोकल

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल उद्यापासून बंद होणार आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही लोकलसेवा बंद राहणार असल्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्याचसोबत मध्य रेल्वेने देखील ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २० मार्च ते ३१ मार्च दरम्यान दोन्ही मार्गावरील एसी लोकलसेवा बंद राहणार आहे. 

पश्चिम रेल्वेने यामार्गावरुन धावणाऱ्या सर्व एसी लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी, ठाणे-नेरूळ आणि ठाणे-पनवेल दरम्यान धावणाऱ्या एकूण १६ एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, एसी लोकलमधील तापमान कमी असल्यामुळे आणि थंड ठिकाणी कोरोनाचा अधिक संसर्ग होण्याची शक्यता असल्याने एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. राज्यात आतापर्यंत ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ४९ पैकी ४० रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. तर त्यांच्यामुळे इतर ९ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती गुरुवारी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

मोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ac local services on western railway and central railway suburban in maharashtra will be cancelled from tomorrow