पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

अब्दुल सत्तार (ANI)

गेल्या सोमवारीच महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न शिवसेना नेतृत्त्वाकडून सुरू आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील वृत्त दिले आहे.

उद्धव ठाकरे विधान परिषद पोटनिवडणुकीत उतरणार?

शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यमंत्रीपद मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज झाले होते. त्यातच औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रचनेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ येणार असल्यामुळे ते जास्त नाराज झाले. ज्या पक्षामधून बाहेर पडून मी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पक्षाला अकारण पाठिंबा देण्याची वेळ आपल्यावर येते आहे. हे मला मान्य नाही, अशी अब्दुल सत्तार यांची भूमिका आहे. 

३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - लष्करप्रमुख

दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना पाठविण्यात आले आहे. या दोघांमध्ये बंद खोलीत काही वेळ चर्चा झाली. पण त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी कोणतीही माहिती दिली नाही. विधानसभा निवडणुकीआधी अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.