मेट्रोसाठी मुंबईतील आरे कॉलनीत सुरु असलेल्या वृक्षतोडी विरोधात आता वंचित बहुजन आघाडीही उतरली आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आरेतीली मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. आमची सत्ता येवो अथवा न येवो हे जंगल सुरक्षित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा लढा असाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या बसमध्ये बसून स्वतःला अटक करुन घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या, काळे झेंडे दाखवले. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.
आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
प्रकाश आंबेडकर हे आज (रविवार) सकाळीच वृक्षतोडीस विरोध करण्यासाठी आले. यावेळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनाही मोठा फौजफाटा तैनात केला होता. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरु होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, ज्या पद्धतीने मुंबईची समुद्र साफ करतो अगदी त्या पद्धतीने हवा साफ करण्याचे काम हे जंगल करते. हे जंगल टिकले पाहिजे. आमचे सरकार येवो अथवा न येवो. हे जंगल सुरक्षित राहिले पाहिजे. आम्ही यासाठी प्रयत्न करत राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरेच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा
वंचित बहुजन आघाडीनेही या आंदोलनात सहभाग घेतल्याने वृक्षतोडी विरोधातील कार्यकर्त्यांना आणखी बळ आले आहे. दरम्यान शनिवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.