पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शरद पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का?'

सुधीर मुनगंटीवार

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामध्ये मोदींची तुलना शिवरायांसोबत केल्यामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड सुरु केली आहे. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गा माता म्हणणं योग्य होतं का? असे सवाल उपस्थित केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 

JNU तील त्या दिवशीचा सर्व डेटा जपून ठेवा, हायकोर्टाचे ऍपल, गुगलला आदेश

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. अतिशय नीच दर्जाचे राजकारण ते करत आहेत. जेव्हा स्व. इंदिरा गांधींनी बांगलादेशबरोबरचे युध्द जिंकले तेव्हा संसदेत त्यांना दुर्गा देवीचा आवतार असल्याचे म्हटले गेले होते. दुर्गादेवीची बरोबरी इंदिरा गांधी कधीच करु शकत नाही हे समाज मनाला माहिती होते. तसंच इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा मातेशीही करण्यात आली होती. त्यावर कुणीच आक्षेप घेतला नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.   

शिवरायांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही: बाळासाहेब थोरात

छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी जाणता राजा उपाधी ही शरद पवारांना दिली. जाणता राजा नावाचे पुस्तक शरद पवारांवर निघाले. ज्यांच्या कार्यकाळात ३५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? त्यांना जाणता राजा म्हटलेले चालते का?, असे अनेक  सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केले आहेत. तसंच,  आपल्या एखाद्या वक्तीचा गौरव करताना असे वाक्य अनेकदा वापरले गेले असल्याचे देखील त्यांनी  सांगितले आहे. 

कोहली लय भारी! स्मिथची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही