पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य, आता करून दाखवा; #AadityaTeraVaada ट्रेंडमध्ये

राजकारणाच्या मैदानात उतरणारे आदित्य हे ठाकरे कुटुंबियातील पहिले आहेत

वरळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी ट्विटरवर भारतात ट्रेंडिंगमध्ये आहेत. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही सत्तेत आल्यावर आरे कॉलनीला जंगल घोषित करू, असे आश्वासन दिले होते. त्यावरूनच आता ट्विटरवर हजारो लोक #AadityaTeraVaada हा हॅशटॅग वापरून आदित्य यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत आहेत. 

आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी

आदित्य ठाकरे आता सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांची ताकद फक्त ट्विटरवर दाखवून देऊ नये. त्यांच्या कृतीतूनही दाखवून द्यावी, असे ऍनी नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे. आरेतील वृक्षतोड केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हा वाद भाजप विरुद्ध शिवसेना असा नसल्याचे म्हटले होते. त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध पर्यावरण असा हा वाद असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता ते सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनविरुद्ध काय कारवाई करणार, असा प्रश्न कृष्णा अय्यर यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. 

रिलायन्स जिओफोनसाठी 'ऑल इन वन' प्लॅन लाँच, काय आहे वेगळेपण

शिवसेना आता सत्तेत आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आश्वासन पाळले पाहिजे आणि आरेला जंगल घोषित केले पाहिजे, असे साहिल पारसेकर यांनी म्हटले आहे.