पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्रे स्टेशनवरील मजुरांच्या गर्दीस केंद्र सरकार जबाबदारः आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

वांद्रे स्टेशनवर लॉकडाऊनचा फज्जा उडवत जमा झालेल्या हजारो मजुरांच्या गर्दीचे खापर राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर फोडले आहे. वांद्रे स्टेशनवरील सध्याची स्थिती आणि सूरतमध्ये झालेली मजुरांची दंगल ही केंद्र सरकारच्या अपयशामुळे झाली आहे. प्रवासी मजुरांना घरी पाठवण्याच्या व्यवस्थेबाबत केंद्र सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यांना जेवण आणि राहण्याचे ठिकाण नकोय. त्यांना घरी जायचे आहे, असे टि्वट आदित्य ठाकरे यांनी केले. 

देशात १० लाख व्यक्तींमागे केवळ १४९ टेस्ट, राहुल गांधींनी केला दावा

आदित्य ठाकरे यांनी सलग टि्वट करत केंद्र सरकारवर टीका केली. ज्या दिवशी रेल्वे बंद करण्यात आली. त्यावेळी प्रवासी मजूर त्यांच्या घरी परतावे यासाठी राज्य सरकारने २४ तासांसाठी रेल्वे सुरु करावी अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. प्रवासी मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील त्यांच्या घरी पाठवण्यासाठी रोडमॅप करण्याची मागणी केली होती. केंद्राकडून तयार करण्यात आलेल्या या रोडमॅपच्या माध्यमातून प्रवासी मजुरांना एक राज्यातून दुसऱ्या राज्यात त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित आणि प्रभावकारी पद्धतीने पोहोचण्यासाठी उपायकारक ठरले असते. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, सूरतमध्येही कायदा-व्यवस्थेची अशीच स्थिती आहे. जिथे-जिथे प्रवासी मजूर आहेत. त्या सर्व ठिकाणांहून अशीच प्रतिक्रिया येत आहे. लोक जेवण आणि राहण्यास तयार नाहीत. 

महाराष्ट्रात सहा लाखांहून अधिक लोक विविध शिबिरात राहत असल्याचेही आदित्य यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Aaditya Thackeray Blame center govt for gathering crowd of thousands at Bandra station in lockdown