पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरारमधील रिक्षाचालकाला आदित्य ठाकरेंकडून एक लाख रुपयांचे खास बक्षिस!

सागरकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

विरार रेल्वे स्थानकाबाहेर एका महिलेला प्रसुती वेदना होत असताना मदतीला धावून गेलेल्या रिक्षाचालकाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश या रिक्षाचालकासाठी दिला.

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल

४ ऑगस्ट रोजी सागर कमलाकर गवाड नावाच्या रिक्षाचालकाने विरार रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर रिक्षा नेऊन तेथून प्रसुती वेदना होत असलेल्या महिलेला रुग्णालयात नेले होते. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी सागरला अटक केली होती. या संदर्भातील बातमी वाचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सागरशी संपर्क साधला. त्यादिवशी काय घडले, हे त्याच्याकडून जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश पाठवून दिला. विरार पश्चिमेला असलेल्या डोंगरपाडा येथे सागर याच्या निवासस्थानी त्याच्याकडे हा धनादेश देण्यात आला.

त्यादिवशी त्या महिलेला मदत करणे गरजेचे होते म्हणून मी धावून गेलो होते. पण त्याचवेळी नियम पाळले पाहिजेत, हे सुद्धा मला मान्य आहे, असे सागर गवाड याने सांगितले.

पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे ६ हजार कोटींची मागणी

सात महिन्यांची गरोदर असलेली ती महिला आणि तिचा पती हे दोघेही लोकलमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये बसले होते. महिलेला वेदना होऊ लागल्यावर महिलेच्या पतीने मदतीची याचना केली. त्यावेळी तिथे सागर उभा होता. त्याने लगेचच आपली रिक्षा थेट फलाटावर आणून संबंधित महिला ज्या डब्यात बसली होती. तिथे तो घेऊन गेला. गरोदर महिला आणि तिच्या पतीला घेऊन लगेचच तो एका खासगी रुग्णालयात गेला.