पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवली : मारहाणीत नाही तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाला महिलेचा मृत्यू

(छाया सौजन्य : एएनआय)

पाळीव श्वान सतत भुंकत असल्यानं झालेल्या शुल्लक वादातून डोंबिवलीत महिलेला चार जणींनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर महिलेचा मृत्यू झाला होता. मारहाणीमुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र महिलेचा मृत्यू हा मारहणीनंतर काळी वेळानं हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आलं आहे. 

गे डेटिंग अ‍ॅपमुळे सीईओसह ५० हून अधिक वरिष्ठ अडकले हनीट्रॅपमध्ये

 मारहाणीनंतर महिलेनं पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती. तिला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र ती थेट घरी गेली. नंतर छातीत दुखू लागल्यानं तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिचा तिथेच मृत्यू झाला अशी माहिती पोलिस अधिकारी विवेक पानसरे यांनी दिली. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

डोंबिवलीच्या मानपडा येथे राहणाऱ्या या महिलेनं श्वान पाळला होता. मात्र हा श्वान रात्रभर भुंकतो त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार अनेकदा तिच्या शेजारच्यांनी केली होती. याच कारणावरून शेजारी राहणाऱ्या ४ महिलांसोबत तिचा वाद झाला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. चार महिलांनी तिला मिळून मारहाण केली. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला मात्र तिचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला  असल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आलं. 

बस-ट्रकच्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू, ८ गंभीर जखमी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A woman died of a heart attack in Dombivli allegedly thrashed by another woman over constant barking by her dog