पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेरणादायीः कोरोनाविरोधात लढण्यासाठी हेडकॉन्स्टेबलने दिले १० हजार रुपये

हेडकॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मदतीचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हाती सोपव

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी विविध क्षेत्रातील मातब्बर, सेलिब्रेटी, उद्योगपती निधी किंवा विविध स्वरुपात मदत करत आहेत. पण यात सर्वसामान्य नागरिकही मागे नाहीत. महाराष्ट्र पोलिस खात्यातील एका हेडकॉन्स्टेबलने आपल्या परीने मदत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील डोंगरी येथे कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी कोरोनाविषाणू विरोधात लढण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्या बचतीतून मुख्यमंत्री निधीला १० हजारांची मदत केली आहे. डांगरे यांनी मदतीचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हाती सोपवला आहे. हेडकॉन्स्टेबल डांगरे यांच्या या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. 

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

डांगरे यांचे हे कार्य कौतुकास्पद तर आहेच. शिवाय ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून पोलिस विभागही गेल्या १५ दिवसांपासून कार्यरत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विभाग कार्यरत आहे. आपले कर्तव्य बजावत असतानाही आर्थिक मदत देऊन डांगरे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. 

निजामुद्दीन मरकज: चीनसह ६७ देशातून आले होते २०४१ नागरिक

दरम्यान, विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित ११२५ रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा प्रेमजी फाऊंडेशनचा असेल. विप्रो लि. १०० कोटी, विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A Mumbai Police Head Constable has donated Rs 10000 to CMs COVID19 relief fund coronavirus