पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्यात लॉकडाऊनचे उल्लंघन, घरी जाण्यासाठी मजुरांची स्टेशनवर गर्दी

वांद्रे स्टेशनवर मजुरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. या घोषणनंतर मुंबईतील वांद्रे स्टेशनवर हातावर पोट असलेल्या कामगारांनी हजारोच्या संख्यने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत या मंडळींनी आपापल्या घरी जाण्याची मागणी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना स्टेशन परिसरात एकत्रित आलेल्या जमावावर लाठिचार्जही करावा लागला.  

देशात १० लाख व्यक्तींमागे केवळ १४९ टेस्ट, राहुल गांधींनी केला दावा

लॉकडाउनच्या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाचे चांगलेच हाल होत आहेत. रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये अडकून असलेल्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. लॉकडाउनच्या पहिल्या फेजमध्ये दिल्लीच्या सीमारेषेवरील भागात कामगारांनी घरी जाण्यासाठी पायपीट केल्याचे समोर आले होते.

'सिलिकॉन व्हॅलीत कर्मचाऱ्यांसह वेतनातही कपात, नवीन भरती स्थगित'

त्यानंतर आता लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी मुंबईत आलेल्या कामगारांनी आपापल्या घरी जाण्याची मागणी लावून धरल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचे उल्लंघन करत त्यांनी आपल्याला या संकटातून बाहेर काढण्याची विनंती केल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे हे चित्र पाहायला मिळाले अशी टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: A large group of migrant labourers gathered in Bandra demanding for permission to return to their native states