पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अबब ! सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोन्याचे दान

सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोन्याचे दान (ANI)

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला एका भाविकाने सुमारे ३५ किलो सोन्याचे दान दिले आहे. या सोन्याची किंमत बाजारात सुमारे १४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वांधिक लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे. 

'परीक्षा पे चर्चा' म्हणजे फक्त 'नौटंकी', कपिल सिब्बल यांची टीका

हे सोनं दिल्लीत राहणाऱ्या एका भक्ताने आठवड्यापूर्वी हे दान दिले आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मंदिराला कोट्यवधींची देणगी मिळते.

भाविकाकडून मिळालेल्या या ३५ किलो सोन्यातून मंदिराचा गाभारा, दरवाजे व घुमटाला सोन्याचा पत्रा चढवण्यात आला. सोमवारपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये जाणारे केंद्रीय मंत्री डरपोकः मणिशंकर

ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले, मंदिराच्या इतिहासात प्रथमच इतके मोठे सोन्याचे दान एखाद्या भक्ताने दिले आहे. गेल्या दोन वर्षांत मंदिराच्या दानात वाढ झाली असून ३२० कोटींचे दान आता ४०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A devotee from Delhi has donated gold plating weighing around 35 kg to Shri Siddhivinayak Temple