पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आक्रमक पीएमसी खातेदार 'मातोश्री'वर; मुख्यमंत्री म्हणाले, मी तुमच्या बरोबर

उद्धव ठाकरेंनी खातेदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली (छायाचित्रः सत्यब्रत त्रिपाठी, एएनआय))

पीएमसी बँकेच्या आक्रमक खातेदारांनी रविवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री गाठून आपला निषेध नोंदवला. अचानक आलेल्या आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. उद्धव ठाकरे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खातेदारांच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि आपण पीएमसी खातेधारकांबरोबर असल्याचे सांगत लवकरच आणखी एक भेट घेऊ असा शब्द दिला. यामुळे आंदोलकांना थोडासा दिलासा मिळाला. 

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी रविवारी सकाळी आरबीआयवर मोर्चा नेला. तिथे त्यांनी 'आरबीआय चोर है' च्या घोषणा दिल्या. आमच्या बाजूने कोणीच नसल्याची प्रतिक्रिया संतप्त खातेधारकांनी दिली. बँक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलक करत होते.

आरबीआयसमोरील आंदोलन संपवून सर्व खातेदार थेट मातोश्रीवर धाव घेतली. अचानक आलेल्या आंदोलनकर्त्यांमुळे तारांबळ उडालेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांची मातोश्रीतून दखल घेण्यात आली. काही आंदोलकांना आत बोलावून त्यांच्याशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. शिवसेना खातेधारकांबरोबर असल्याचा विश्वास देत आपण लवकरच आणखी एक बैठक करु असा शब्द त्यांनी दिला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A delegation of PMC Bank depositors has gone inside Matoshree to meet CM Uddhav Thackeray