पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मुंबईत मृत्यू, नेमक्या कारणामुळे संभ्रम

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील खासगी रुग्णालयात ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. संबधीत व्यक्ती हा फिलिफिन्सचा नागरिक होता. या व्यक्तीचा कोरोनाचा प्राथमिक रिपोर्ट सुरुवातीच्या चाचणीदरम्यान पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला होता. त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. १३ मार्चला  त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मात्र आधी चाचणी  पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आल्यामुळे मृत्यूच्या नेमक्या कारणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या रुग्णाला  आरोग्याच्याही अनेक समस्या होत्या.

 

दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

त्याची आरोग्य चाचणी आधी पॉझिटिव्ह आली मग निगेटीव्ह, त्याचा मृत्यू नेमका कोरोनानं  झाला की नाही  हे टेक्निकल कमिटी तपासून पाहिल अशी माहिती महानगर पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह  यांनी दिली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील फिलिफिन्सचा नागरिकाच्या नेमक्या मृत्यूमागचे कारण काय आहे हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोनाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला, १५ मिनिटांत ८ लाख कोटी बुडाले

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णाची आकडेवारी वाढतच चालली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नव्या १५ कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १४ जण मुंबईतील तर १ जण पुण्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  सोमवारी सकाळपर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.
बेपत्ता होम क्वारंटाइन लोकांना पुणे पोलिसांचा इशारा