पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाशीत कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा मृत्यू

इटलीतील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईतील वाशी येथे एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे वय ६५ वर्षे इतके होते. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरु होते. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. 

चीनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर, कार उत्पादक कारखाने सुरू

या महिलेवर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते, असे एका वृत्त वाहिनीने सांगितले. 'एएनआय'ने आरोग्य विभागाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

हवेत आर्द्रता जास्त असल्यास कोरोनाचे संक्रमण घटते, नवे संशोधन

दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून प्रत्येकी एक असे दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. बुधवारी एका दिवसात राज्यात १५ नवी प्रकरणे समोर आली होती. त्यात मुंबईतून ९, ठाण्यातून १ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील ५ रुग्णांचा समावेश होता.