उपचारांच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५७ वर्षीय मानसोपचारतज्ज्ञाला गुरुवारी रात्री कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं या मानसोपचारतज्ज्ञाला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संजॉय मुखर्जी असं या मानसोपचारतज्ज्ञाचे नाव आहे. बोरीवलीमध्ये त्याचा दवाखाना आहे. जुलै २०१८ मध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनी संजॉय मुखर्जीकडे उपचारांसाठी गेली होती. मात्र उपचारांच्या बहाण्यानं त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याचं त्यानं चित्रणही केले.
बस-ट्रकच्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू, ८ गंभीर जखमी
याची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्यानं मुलीला दिली. जुलै ते ऑक्टोबर या काळात तीनदा उपचारांच्या बहाण्यानं संजॉय मुखर्जीनं मुलीवर अत्याचार केले. अखेर या मुलीनं उपचारांसाठी जाणं बंद केलं. कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या महिला मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारांसाठी नेले असता, त्यांनी विश्वासात घेऊन संवाद साधला असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी पीडित मुलीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मानसोपचारतज्ज्ञाला अटक केली.
मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेसंदर्भातील तक्रारीची EC कडून दखल