पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेमप्रकरणातून धडा शिकवण्यासाठी दिली सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी

सिद्धिविनायक मंदिर

माजी प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिन ठेवल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु, पोलिस तपासात खरी बाब समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

शालीमार एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या जिलेटिन कांड्या प्रकरणाला नवे वळण

ठाण्यातील विवियाना मॉलच्या शौचालयात सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी असलेला कागद चिटकवण्यात आला होता. 'गज्वा-ए-हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम.. इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज अॅक्टिव्हेटेड', असा संदेश होता. या संदेशासह एका मुलीचा आणि मुलाचा मोबाइल क्रमांक लिहिला होता. या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतल्यानंतर आपल्या आधीच्या प्रियकराचे हे कृत्य असू शकते, अशी शक्यता मुलीने वर्तवली. यानंतर ठाणे पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या तरूणाने एकतर्फी प्रेमातून कृत्य केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी करार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A 25 year old man was arrested for a terror attack hoax planted in a Thane mall Siddhivinayak temple