महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे एकूण सहा संशयित आढळले आहेत. मुंबई उपनगरातील दहिसर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या संशयित रुग्णाला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे सहा संशयित आढळले असले तरी विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण नाही.
चीनमध्ये अडकलेल्या ३०० भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलविणार
मुंबईत सहावा संशियत रुग्ण बुधवारी दाखल झाला आहे. हा १९ वर्षीय विद्यार्थी ऑगस्ट २०१९ पासून शंघायमध्ये राहत आहेत. १६ जानेवारीला तो भारतात परत आला. त्यानं चीनमधल्या विविध भागात प्रवास केला आहे. त्यात कोरोनाचं केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरापासून ३५० किलोमीटवर असलेल्या चांगशा शहराचाही समावेश आहे. २८ जानेवारीला कोरोनाची लक्षण आढळल्याची तक्रार त्यानं केली त्यानंतर त्याला उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे.
देशाविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलची रवानगी पोलिस कोठडीत
आतापर्यंत ३ संशयित रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तपासणीनंतर कोरोनाची बाधा त्यांना झाली नसल्याचं समोर आलं आहे. मात्र आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असून त्यांच्या आरोग्याची विचारपूर करत आहोत अशी माहिती पालिकेनं दिली आहे.
कोरोना विषाणूची सर्वसामान्य लक्षणे
सर्दी आणि खोकला
गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे
श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
न्यूमोनिआ
पचनसंस्थेची लक्षणे - अतिसार
काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे
प्रतिकार शक्ती कमी होणे
जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले बक्षीस
विषाणूचा प्रसार कसा होतो ?
राज्य सरकारच्या निवेदनानुसार, या विषाणूचा प्रसार कसा होतो याची निश्चित माहिती तूर्त उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे.