पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

९८ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचे 'बंद'साठी मतदान, पॅनेलने पुकारले धरणे आंदोलन

बेस्ट बससेवा (संग्रहित छायाचित्र)

बेस्ट कामगार संघटनेच्या कृती समितीने सोमवारी वडाळा डेपो येथे प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. महत्वाचे म्हणजे १७९२५ कर्मचाऱ्यांपैकी ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी संपासाठी मतदान केले होते. पण कृती समितीने धरणे आंदोलन पुकारले आहे. 

वेतनवाढीसाठी धरणे आंदोलन पुकारलेल्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप करणार नसल्याचे स्पष्ट केले. धरणे आंदोलन उद्या (सोमवारी) ११ वाजता सुरु होणार आहे. 'बंद पुकारुन आम्हाला प्रवाशांची गैरसोय करायची नाही. सोमवारपासून आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यानंतर संपाबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत,' अशी माहिती युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली. 

मुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा? नवा प्रस्ताव

बेस्ट बससेवा ही मुंबईतील लोकल सेवेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. कृती समितीने मतदानात कर्मचाऱ्यांनी संपाला दिलेला कौल सांगितला. १७९२५ बेस्ट कर्मचाऱ्यांनी मतदानात सहभाग नोंदवला. यातील १७३१ जणांनी ऑनलाइन मतदान केले.

यापूर्वी कृती समितीने ७ एप्रिलला बंद पुकारला होता. परंतु, बेस्ट व्यवस्थापनाशी चर्चेनंतर हा बंद पुढे ढकलण्यात आला होता. जर बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला तर त्याचा मुंबईतील ३० लाख प्रवाशांना फटका बसतो. जानेवारीत बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी ९ दिवस बंद पुकारला होता.