पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत कोरोनाचे आणखी ९ रुग्ण; राज्यातील बाधितांचा आकडा १५६ वर

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात मुंबईत तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे आणखी ९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८६ वर पोहचला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  

मोदींनी कोरोनाग्रस्त ब्रिटन पंतप्रधानांना दिलं बळं

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईमध्ये कोरोनाचे आणखी ९ रुग्ण आढळले आहेत. यामधील ५ जण परदेशातू प्रवास करुन आलेले आहेत. तर उर्वरीत ४ जणांना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. ९ जणांपैकी ६ जण मुंबईतले आहेत. तर तिघे जण मुंबईच्या आसपासच्या ठिकाणी राहणारे आहेत.'

लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या चाहत्यांना ICC ने दिला हा पर्याय

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एकाच दिवसाशी १२ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सांगलीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २३ वर पोहचला आहे. २३ कोरोनाबाधितांपैकी २० जण एकाच कुटुंबातील आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, सांगलीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.