पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँकेच्या आणखी एका खातेदाराचा ऑपरेशनसाठी पैसे नसल्याने मृत्यू

पीएमसी बँक

रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातल्यामुळे व्यवहारांवर बंधने आलेल्या पंजाब एँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. मुरलीधर धारा असे शुक्रवारी मृत पावलेल्या ८३ वर्षीय खातेदाराचे नाव आहे. त्यांचे या बॅंकेमध्ये ८० लाख रुपये होते. त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करायची होती. पण त्यासाठी आवश्यक पैसे बँकेतून काढता न आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करता येऊ शकले नाहीत, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?

सप्टेंबरमध्ये पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर आतापर्यंतचा हा चौथा बळी आहे. सध्या या बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातून ४० हजार रुपये काढण्याची अनुमती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. त्याचबरोबर जर वैद्यकीय उपचारांसाठी पैसे हवे असतील तर खातेदार जास्त रक्कमही काढू शकतात असे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

मुरलीधर धारा यांना ह्रदयविकार होता. शुक्रवारी राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर ह्रदशस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण पीएमसी बँकेत ८० लाख रुपये असूनही पैसे काढता येत नसल्याने आम्ही उपचार करू शकलो नाही, असे त्यांचा मुलगा प्रेम यांनी पीटीआयला सांगितले.