राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात शनिवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. मागील २४ तासांत ८११ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ हजार ६२८ वर पोहचला आहे. राज्य आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून राज्यातील मृतांचा आकडा हा ३२३ इतका झालाय. शुक्रवारी राज्यात केवळ ३९४ नवे रुग्ण आढळले होते. आज हा आकडा दुप्पटीने वाढला आहे.
मोदी सरकारच्या या तीन निर्णयांमुळे कोरोनाचा संक्रमण वेग आवाक्यात
देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून आकड्यामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ३ मे पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील काही दुकाने खुली करण्याची शिथिलता दिली आहे. पण राज्यातील मुंबई-पुणे याठिकाणी ही शिथिलता लागू करणे तूर्तास शक्य नसल्याचे चित्र आहे. राज्यातील वाढत्या आकड्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतरही पुणे-मुंबई शहरातील लॉकडाऊनमधील निर्बंध कायम ठेवावे लागू शकतात, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी दिले होते.
कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त
दुसरीकडे पुणे पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली शिथिलता पुणे शहरास लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता राज्यातील आकड्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होणे हा राज्य सरकार आणि प्रशासनासाठी चिंता वाढवणारा आहे. राज्यात मुंबईतील कोरोनाचा आकडा हा वेगाने वाढताना दिसतोय. यात धारावीतील रुग्णांची वाढणारी संख्या ही सरकार आणि प्रशासनासमोरी आव्हान आणखी वाढवणारी ठरत आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढतानाचे चित्र दिसत आहे.