पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आग्रीपाडा भागातून ८ लाखांचा बेकायदेशीर मास्कचा साठा जप्त

बेकायदेशीर मास्कचा साठा जप्त

मुंबईच्या आग्रीपाडा भागातील एका घरातून ८ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा बेकायदेशीर मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिसांनी छापा टाकत मोठा मास्कचा साठा जप्त केला. जवळपास ३३ हजार नग '३ प्लाय सर्जिकल मास्क' चा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात मास्कचा साठा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.  

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

महात्मा जोतीबा फुलेनगर, जेकब सर्कल येथील एका घरात मास्कचा बेकायदेशीर साठा करण्यात आला होता. हे मास्क प्रती नग २५ रुपये दराने काळ्या बाजारात विकले जात होते अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरावर छापा टाकला. याठिकाणावरुन काळ्या बाजारात विकण्यात येणारा मास्कचा मोठा साठा जप्त केला. 

PM मोदी आता व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देणार!

पोलिसांनी जप्त केलेल्या ३३ हजार नग '३ प्लाय सर्जिकल मास्क'ची किंमत ८ लाख २५ हजार रुपये ऐवढी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार होणार नाही, तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. तरी सुद्धा अनेक ठिकाणी मास्कचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

तबलिगी जमातवरुन ए आर रहमान म्हणाला...