पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम रेल्वेवर आज ८ तासांचा ब्लॉक; चर्चगेट-मुंबई सेंट्रल लोकल बंद

मध्य रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री उशिरा आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी आज ऑफिसमधून लवकर घरी निघा. रात्री १०.१५ ते सकाळी ६.१५ दरम्यान हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ड रोड दरम्यान फेररे उड्डाण पुलाचा गर्डर काढण्यात येणार आहे. त्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

विशेष ब्लाक दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानची लोकल वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  त्यामुळे चर्चगेटवरुन जलद मार्गावरील शेवटची विरार लोकल रात्री १० वाजता सुटणार आहे. तर धीम्या मार्गावरील शेवटची बोरिवली लोकल रात्री ९.५१ वाजता सुटणार आहे. दरम्यान, बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने येणारी धिम्या मार्गावरील लोकल रात्री ९.०३ वाजता सुटणार आहे. तर, विरारवरुन चर्चगेटला येणारी जलद मार्गावरील लोकल रात्री ८.५१ वाजता सुटणार आहे. 

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट