पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नववर्ष स्वागतासाठी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या शेकडोंवर कारवाई

मुंबई पोलिस

नववर्षाच्या स्वागतावेळी मुंबईत मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी पोलिसांनी ७७८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्याचवेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ११०० जणांवर विविध कलमांतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय आहे: संग्राम थोपटे

मुंबई पोलिसांनी नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी संध्याकाळपासून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांत विविध ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केली. एकूण ५३३८ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी दुचाकी चालविणाऱ्या ५७८ जणांवर तर चारचाकी चालविणाऱ्या २०० जणांवर मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी ४३३ जणांवर मद्यपान करून गाडी चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

माझी निष्ठा कुठं कमी पडली, भास्कर जाधवांचा सवाल

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११०० जणांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ६०१ जणांवर सिग्नल न पाळल्याबद्दल, २५८ जणांवर दुचाकीवरून तीन जणांनी प्रवास केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. मुंबईचे पोलिस सहआयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे यांनी ही माहिती दिली.