पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३०२ वर; ७२ नवे रुग्ण आढळले

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. आज कोरोनाचे ७२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३०२ वर पोहचला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्य आरोग्य विभागाने मंगळवारी ही माहिती दिली आहे.

मोदींच्या आई हिराबेन यांनीही लावला 'PM केअर्स फंड'साठी हातभार

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोनाचे आणखी ७२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३०२ झाला आहे. यामध्ये मुंबईत ५९ रुग्ण, अहमदनगरमध्ये ३, पुण्यात २, ठाण्यात २, कल्याण-डोंबिवलीमध्ये २, नवी मुंबईत २, विरारमध्ये २ रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रवास आणि गर्दी टाळावी असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र सरकारने सांगितलेल्या नियमांचे अनेक जण उल्लंघन करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी SBI कर्मचाऱ्यांकडून १०० कोटींची मदत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:72 more persons have tested positive for covid 19 in maharashtra taking the total number of cases in the state to 302