पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लैंगिक अत्याचारानंतर ७ वर्षांच्या मुलीची हत्या; आरोपीला अटक

भिवंडी पोलिस

भिवंडी येथे ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीच्या सुभाषनगर भागामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांनी १० तासांमध्ये आरोपी भरतकुमार कोरी (३० वर्ष) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

 

'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'

भिवंडीतल्या सुभाषनगर भागातील एका कंपनीच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर ७ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. अत्याचाराबाबत मुलीने कोणाला काही सांगून नये यासाठी आरोपीने तिची हत्या केली होती. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. 

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत: देवेंद्र फडणवीस

भिवंडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यासाठी ६ वेगवेगळी पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १० तासांत आरोपीला अटक केली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी भरतकुमार कोरी हा हमालीचे काम करतो. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

स्वस्तात विमान प्रवासासाठी इंडिगोची धमाकेदार ऑफर