पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत नाल्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

गोरेगाव येथे नाल्यात पडून 2 वर्षाच्या दिव्यांश आणि वरळी येथे खड्ड्यात पडून 15 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असताना अशीच आणखी एक घटना धारावी येथे घडली आहे. धारावीमध्ये नाल्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमित मुन्नालाल जयस्वाल असं या मुलाचे नाव आहे.

राज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

धारावीतील राजीव गांधी कॉलनीजवळ ही घटना घडली आहे. याठिकाणावरुन वाहत असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये अमित पडला. अमित नाल्यामध्ये पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी अमितला बाहेर काढले. लगेच त्यांनी नजिकच्या सायन रुग्णालयात त्याला नेले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

 

NIA चे अधिकार वाढविणारे विधेयक लोकसभेत बहुमताने 

दरम्यान, मागच्या बुधवारी गोरेगाव येथील आंबेडकरनगरमध्ये अशीच घटना घडली होती. दोन वर्षाच्या दिव्यांश सिंह हा नाल्यात पडला. एनडीआरएफ, मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र 3 दिवसांच्या प्रयत्नांनंतरही दिव्यांश सापडला नाही. त्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. तर, वरळी येथे कोस्टल रोडच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 15 वर्षाच्या बबलू कुमार या मुलाचा मृत्यू झाला होता. 

जनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा काय नाकारू शकतो?