पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणुकीत पैसे वाटणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इन्कम टॅक्सकडून शीघ्र कृती दल तैनात

ऑनलाईन व्यवहार करण्यासंदर्भातील वेळेत बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कोणत्याही उमेदवारांकडून पैशांचा गैरवापर करून मतदारांवर प्रभाव टाकला जाऊ नये, तसेच निवडणुकीत पैशांचा गैरवापर केला जात नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एकूण ६०३ अधिकाऱ्यांची भलीमोठी फौज तयार केली आहे. हे अधिकारी निवडणुकीच्या काळात पैशांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणार आहेत. या अधिकाऱ्यांपैकी २१६ अधिकारी मुंबई आणि परिसरात नियुक्तीवर असणार आहेत. तर पुणे विभागात २५९ अधिकारी नियुक्तीवर असतील. १२८ अधिकारी नागपूर विभागात लक्ष ठेवतील, अशी माहिती प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

BLOG : ही युती (जागेवरून) तुटायची नाय!

प्राप्तिकर खात्यातील तपास विभागाचे महासंचालक नितीन गुप्ता म्हणाले, निवडणुकीच्या काळातील पैशांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. हवाई मार्गाने पैसे नेले किंवा आणले जाऊ नयेत, यासाठी महाराष्ट्रातील विमानतळावरील जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर कोणी पैशांचे वाटप करीत असल्याचे नागरिकांना दिसले, तर त्यांना संपर्क साधता यावा, यासाठी २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही सुरू करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणूक : मंगळवारी राज्यात दाखल झाले इतके उमेदवारी अर्ज

मुंबईत शीघ्र कृती दल कार्यरत असून, नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे २१ सप्टेंबरपासून एकूण चार कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे, असे नितीन गुप्ता यांनी सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये एअर इंडियाच्या इमारतीमध्ये प्राप्तिकर विभागाने एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. त्याचबरोबर आम्ही एसएमएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोहोचणार असून, त्यांना कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास आम्हाला संपर्क करण्यास सांगण्यात येणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.

संपर्क साधण्यासाठी हे आहेत टोल फ्री क्रमांक
मुंबई - 1800221510
पुणे - 18002330700/01
नागपूर - 18002333785